पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२० मिनिटांचे भाषण ५ मिनिटांत आटोपत मूर्तींनी दिला वक्तशीरपणाचा धडा

नारायण मूर्ती

इन्फोसेसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दिल्लीतील अ‍ॅमेझॉनच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. मात्र या कार्यक्रमात त्यांनी २० मिनिटांचे नियोजित भाषण अवघ्या  ५ मिनिटात आटोपते घेतले. जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आयोजित संभव शिखर संम्मेलनाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम सुरु होण्यास खूप विलंब झाला. नियोजित वेळेच्या जवळपास दीड तास उशीराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. आपल्या भाषणात नारायण मूर्ती यांनी याबाबतची नाराजी व्यक्त केली. वेळेतील अशा दिरंगाईचा प्रकार मला माहित नाही, अशा शब्दांत त्यांनी आयोजकांना टोला लगावला.

'इंदिरा गांधी अन् डॉन करीम लाला यांच्या मुंबईत भेटीगाठी व्हायच्या'

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण मूर्ती यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली. ते म्हणाले की, आपला कार्यक्रम नियोजित वेळेपक्षा दीड तास उशीराने सुरु झाला आहे. माझे २० मिनिटांचे भाषण ११ वाजून ४५ मिनिटांपर्यंत (सकाळी) संपणे अपेक्षित होते. मात्र आताच ११ वाजून ५३ मिनिटे झाली आहेत. मला २० मिनिटे बोलायचे होते. पण आता ५ मिनिटांत माझे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करीन. नारायण मूर्ती वेळेत कार्यक्रमाला पोहचले होते. पण हा कार्यक्रमच सुरु होण्यास विलंब झाला होता. लघु तसेच मध्यम उपक्रमासंदर्भात आयोजित कार्यक्रमासाठी अमेझॉनचे प्रमुख जफे बेजोस देखील उपस्थित होते.  

'छत्रपतींच्या घराण्याविषयी एकही अपशब्द कदापी खपवून घेणार नाही'

भाषण संपल्यानंतर नारायण मूर्ती यांनी तात्काळ व्यासपीठ सोडले. अमेझॉनचे प्रमुख जेफ बिजोस यांच्या विनंतीनंतर ते पुन्हा व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. बिझोस यांनी मूर्तींच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तसेच मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. ई-कॉमर्स नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या उद्धेशाने Amazon.com ने क्लाउडटेलसोबत मोठी भागीदारी केली आहे. बेजोस आणि मूर्ति यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:When Narayana Murthy had to paraphrase his talk at Amazon event His reason jeff bezos India Delhi visit