पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... या जिल्ह्यातील व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनना पोलिसांकडे नोंदणी बंधनकारक

व्हॉट्सऍप

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या केंद्रशासित प्रदेश लडाखमधील लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्यांतील व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनना आता पोलिसांकडे नोंदणी करावी लागणार आहे. पोलिसांनी तशा सूचना सर्व व्हॉटसऍप ग्रुप ऍडमिनना दिल्या आहेत.

क्षेपणास्त्र हल्ल्यात '८० अमेरिकी दहशतवादी' मारले गेले - इराण

पोलिसांनी दिलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, सध्या काही जणांकडून व्हॉट्सऍप ग्रुपचा वापर माथी भडकाविण्यासाठी केला जातो. त्यांच्याकडून व्हिडिओ, ऑडिओ आणि मजकुराच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविली जाते. वैयक्तिक फायद्यासाठी हे केले जाते. ज्यामुळे समाजातील वातावरण कलुषित होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या या मजकुरामुळे एखाद्याची नाहक बदनामी केली जाते. समाजातील शांतता भंग करणारे असे व्हिडिओ कोणाकडून प्रसारित केले जाताहेत, यावर लेहमधील पोलिसांचे लक्ष आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

भविष्यात काहीही घडू शकते: सुधीर मुनगंटीवार

कारगिलमध्येही पोलिसांनी अशा पद्धतीच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. संवेदनशील विषयांवर आक्षेपार्ह मजकूर कोण प्रसिद्ध करतो आहे, यावर पोलिसांचे लक्ष आहे. कारगिलमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही दिवसांपूर्वीच पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी ही सूचना जारी केली आहे. लेह आणि कारगिलमध्ये शांतता राहावी, यासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.