पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

LIC चे अंशतः खासगीकरण, पॉलिसीधारकांसाठी शाप की वरदान?

एलआयसी

गेल्या शनिवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीचे अंशतः खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. आपल्या ताब्यातील एलआयसीचा काही हिस्सा सरकार प्राथमिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून शेअर बाजारात विकणार आहे. खरंतर सरकारच्या ताब्यातील नफा कमाविणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी एक म्हणजे एलआयसी. पण आता एलआयसीवरील आपली संपूर्ण मालकी सरकार सोडणार आहे. एलआयसीकडे सध्या ३० ट्रिलियन रुपयांची संपत्ती आहे. आता याच कंपनीचे अंशतः खासगीकरण होणार असल्यामुळे विमाधारकांवर याचा काय परिणाम होणार, विमाधारकांसाठी हा निर्णय वरदान ठरेल की शाप याची तज्ज्ञांकडून मिळालेली माहिती या बातमीत देत आहे.

पुणेः पीएमपीच्या बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एलआयसीचे अंशतः खासगीकरण ही खरंतर या कंपनीच्या विमाधारकांसाठी सकारात्मक घटना आहे, असे सेक्युअरनॉऊचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक बोंदिया यांनी सांगितले. ते म्हणाले, एलआयसी ही सध्या पूर्णपणे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. त्यामुळे शेअर बाजाराच्या दृष्टीने त्याचे विश्लेषण कधीच करण्यात आले नाही. विमा कंपनीच्या परफॉर्मन्सवर विमाधारकांना आपल्या विम्यावर परतावा कसा मिळणार हे अवलंबून असते. पण जर विमा पॉलिसी शेअर बाजाराशी जोडलेली नसेल (युनिट लिंक्ड) तर विमा धारकांसाठी विमा कंपनीचा परफॉर्मन्स तपासणे हे मर्यादितच राहते. वर्षातून एकदाच बोनस जाहीर झाल्यावर काही प्रमाणात अंदाज येतो. आता एलआयसीचा काही हिस्सा शेअर बाजारात खुल्या समभाग विक्रीद्वारे नोंदविला जाणार असल्यामुळे विमाधारकांना रोजच्या रोज एलआयसीचे कामकाज कसे सुरू आहे, याचा अंदाज येऊ शकेल. यामुळे एलआयसी थेटपणे सेबीच्या अंतर्गत येणार आहे. एलआयसीच्या व्यवस्थापनाला शेअर बाजाराशी निगडीत सर्व निकष पूर्ण करावे लागणार आहेत. यामुळे कंपनीचे व्यवस्थापन अधिक नेमके होईल आणि विमाधारकांना याचा फायदाच होईल.

... म्हणून इन्कम टॅक्ससाठी अर्थमंत्र्यांनी आणली नवी पद्धत

प्लॅनरुपी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक अमोल जोशी म्हणाले, कोणतीही कंपनी शेअर बाजारात उतरत असेल तर ते सर्व संबंधित घटकांसाठी उपयुक्तच असते. कारण यामुळे अधिक पारदर्शकता येते. गुंतवणूकदारांकडून संबंधित कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व घटकांची सविस्तर माहिती घेतली जाते. एलआयसी ही सामान्य कंपनी निश्चितच नाही. एलआयसी शेअर बाजारात उतरत असल्यामुळे विमाधारकांना फायदाच होईल. त्याचबरोबर एलआयसी इतर स्पर्धकांशी स्पर्धा करण्यासाठी अधिक सुसज्ज होईल. आपल्या विमाधारकांच्या फायद्याचे निर्णय घेण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर असेल त्याचा विमाधारकांना फायदाच होईल.