पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMC बँक खातेधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार हे पाऊल उचलणार

पीएमसी बँक

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएमसी) विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे माजी अर्थमंत्री व ठाकरे सरकारमधील विद्यमान मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी दिली. पीएमसी बँकेतील खातेधारकांना न्याय मिळावा यासाठी पीएमसी बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गरज भासल्यास विलीनीकरणाबाबत राज्य सरकार रिझर्व्ह बँकेशीही चर्चा करेल, असे पाटील यांनी म्हटले आहेत.

पीएमसी बँक घोटाळा: आणखी तीन संचालकांना अटक

पीएमसी बँक प्रकरणाबद्दल जयंत पाटील म्हणाले की, या बँकेतील खातेधारकांनी चिंता करण्याची कोणतीच गरज नाही. सरकार तुमच्या पाठिशी आहे. खातेधारकांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासंदर्भात राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांशी चर्चा केल्याची माहिती जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पीएमसी बँकेतील हजारो खातेधारकांना दिलासा देण्यासाठी विलीनीकरणाबाबतचा निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे, असेही राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांना सांगितल्याची माहिती देखील जयंत पाटील यांनी यावेळी दिली. 

PMC बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये आणखी वाढ

 पीएमसी बँकेतील ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर या बँकेत खाते असणारा सामान्य माणून हवालदिल झाला आहे. आयुष्यभराची कमाई या बँकेत अडकून असल्याने काही खातेधारकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. पीएमसी बँक घोटाळा समोर आल्यापासून खातेधारकांना आपल्या खात्यातून पैस काढण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. सध्याच्या घडीला पीएमसी बँकचा कारभार हा रिझर्व्ह बँकेच्या प्रशासना अंतर्गत सुरु आहे. पीएमसी बँक ११ हजार ६०० कोटी रुपये जमा असलेली देशातील १० प्रमुख सहकारी बँकापैकी एक आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: we have suggested merger of troubled pmc bank with Maharashtra State Cooperative Bank says jayant patil