पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जियोला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने आणला १२९ रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन

जियो कंपनी टेलिकॉम क्षेत्रात आल्यानंतर या क्षेत्रातील इतर कंपन्या रोज नवनवीन प्लॅन आणताना दिसत आहेत. या कंपन्या आपल्या जुन्या प्लॅनमध्येही बदल करत आहेत. टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. 

हा बदल केला..

व्होडाफोन १२९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये २ जीबी डेटा देत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवस आहे. यापूर्वी या प्लॅनमध्ये १.५ जीबी डेटा मिळत होता. इतर कंपन्यांच्या प्लॅन्समधील बदल पाहून व्होडाफोनने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. ग्राहकाला यामध्ये फ्री लाइव्ह टीव्ही, मुव्हीज सारखे फायदे मिळणार आहेत.

ओला, उबर झाले जुने, नव्या कंपन्यांच्या प्रवेशाने ग्राहकांचा फायदा!

एअरटेल १२९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस मिळतील. हा प्लॅन २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह असेल. या प्लॅनच्या रिचार्जवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी कॉलिंगसह नॅशनल रोमिंग कॉल्स मिळतील. या प्लॅनमध्ये एअरटेल टीव्ही सबस्क्रीप्शन आणि मोफत विंक म्युझिक सबस्क्रीप्शनही मिळेल.

रिलायन्स जियो १४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण ४२ जीबीचा डेटा मिळेल. यामध्ये प्रति दिन १.५ जीबी डेटा मिळेल. त्याचबरोबर यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि १०० एसएमएसही मिळतील. १४९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये माय जियो, जियो सिनेमा, जियो न्यूज आणि जियो क्लाऊड ऍपची सुविधाही मिळेल.

रिलायन्स जियो ९८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्लॅनमध्ये २ जीबी बंडल्ड डेटाबरोबर ३०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स मिळतील. प्लॅनला २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.