पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्होडाफोन-Idea ची मोठी ऑफर, रोज मिळेल ४०० एमबी अतिरिक्त डेटा

आयडिया, व्होडाफोन

टेलिकॉम सेक्टरमधील वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या रोज नवनवे प्लॅन आणत आहेत. जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी प्रत्येक कंपनी प्रयत्न करताना दिसत आहे. जियोला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन-आयडिया अतिरिक्त डेटाची ऑफर देत आहे. ते आपल्या प्रीपेड प्लान्सवर ४०० एमबी अतिरिक्त डेटा देत आहे.

जियोला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने आणला १२९ रुपयांचा प्लॅन

नवीन ऑफर अंतर्गत व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना ४९९ रुपये आणि ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लान्सवर ४०० एमबी अतिरिक्त डेटा देत आहे. व्होडाफोन-आयडियाच्या नव्या प्लानमुळे एअरटेल आणि जियोला थेट टक्कर मिळेल. कारण कंपनी मे महिन्यापासून काही प्लान्सबरोबर ४०० एमबी डेटा उपलब्ध करुन देत आहे.

आयडिया ग्राहकाने ४९९ रुपये किंवा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान घेतल्यास त्याला रोजच्या डेटाबरोबर ४०० एमबी अतिरिक्त डेटा मिळेल. पण हा अतिरिक्त डेटाचा फायदा मिळवण्यासाठी ग्राहकांना माय आयडिया रिचार्ज किंवा पेमेंट्स अॅपवरुन रिचार्ज करावे लागेल. सध्या व्होडाफोनच्या ग्राहकांना अतिरिक्त डेटाचा लाभ ४९९ रुपयांच्या प्लानबरोबर दिला जात नाही.