पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐतिहासिक तोट्यानंतर व्होडाफोन-आयडियाची सरकारकडे मदतीची याचना

व्होडाफोन-आयडिया

भारताच्या खासगी कंपन्यांच्या इतिहासात तिमाहीतील सर्वोच्च तोटा सहन केल्यानंतर आता व्होडाफोन-आयडियाने मदतीसाठी आणि आपली कंपनी वाचविण्यासाठी थेट केंद्र सरकारकडे मदतीची याचना केली आहे. जर सरकारने उपाय योजले नाही तर आपली कंपनी बंद पडेल, असेही व्होडाफोन-आयडियाने म्हटले आहे.

'शिवसेनेचा मुख्यमंत्री २५ वर्षे राहिल, पण मी पुन्हा येईन म्हणणार नाही'

दूरसंचार क्षेत्रातील परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. त्यातच अनेक खासगी कंपन्यांना तोटा सहन करावा लागतो आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये व्होडाफोन-आयडियाचा निव्वळ तोटा ५०९ अब्ज रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

२०१७ मध्ये ब्रिटिश कंपनीचा स्थानिक विभाग असलेला व्होडाफोन आणि कुमार मंगलम बिर्ला यांच्या आयडियाचे विलिनीकरण करण्यात आले. पण त्यानंतरही या कंपनीला फायदा झालेला नाही. दुसरीकडे तोट्यात वाढच होत चालली आहे. जर आता सरकारकडून काही मदत मिळाली नाही तर कंपनी सुरू ठेवणे अशक्य असल्याचे व्होडाफोन-आयडियाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीने सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा ठेवली आहे.

'बायको घरात नाही, स्वयंपाक करायला येते का?'

व्होडाफोन-आयडियावर १४ अब्ज डॉलरचे निव्वळ कर्ज आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सरकारला देय असलेली रक्कम या कंपनीकडून देण्यात आलेली नाही. ती तातडीने देण्याचे आदेश गेल्याच महिन्या सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले. त्यामुळे कंपनी आणखीनच अडचणीत सापडली आहे.