पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्होडाफोनकडून निर्वाणीचा इशारा; CEOने सरकारकडे मागितली मदत

व्होडाफोन

ब्रिटनची दूरसंचार कंपनी व्होडाफोन येत्या काही दिवसांत आपला व्यवसाय बंद करू शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, व्होडाफोन समूहाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी निक रीड यांनी असहकार असल्याचा आरोप करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निक रीड यांनी सांगितले की, गैर-सहकारी नियमांमुळे आणि जास्त करामुळे आमच्यावर आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या शेअरची किंमत पुन्हा एकदा ४ रुपयांच्या खाली पोहोचली आहे.

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसांची नवी ओळख महाराष्ट्राचा

सरकारने व्होडाफोन-आयडियासह दूरसंचार कंपन्यांना ९२,००० कोटींची थकबाकी भरण्यास सांगितले होते. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात दूरसंचार कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथे त्यांना धक्का बसला. कारण सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना निर्धारित मुदतीत थकबाकी भरण्याचे आदेश दिले. वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, भारती एअरटेलचे २१,६८२.१३ कोटी, व्होडोफोन आणि आयडियाला १९,८२२.७१ कोटींचे परवाना शुल्क सरकारला देणे बाकी आहे. 

..तर तो आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अजित पवारांचे प्रत्युत्तर

या परिस्थितीचा उल्लेख करत व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक रीड यांनी सांगितले की, 'थकबाकीच्या मागणीसाठी सरकारने थोडा नरमपणा घ्यावा. जेणेकरुन व्होडाफोन समुहाचा व्यवसाय भारतात चालू राहू शकेल. असहय्य नियम, जास्त कर आणि त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिकूल निर्णयामुळे आमच्यावर आर्थिक ओझे वाढले आहे. तसंच त्यांनी पुढे असे सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून भारत आमच्यासाठी खूप आव्हानात्मक राहिला आहे. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे.' 

चला चला राष्ट्रपती राजवट आली, दालने सोडण्याची मंत्र्यांची वेळ