पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी सरकार दोनचा अर्थसंकल्प शेअर बाजारला नापसंत, सेन्सेक्स कोसळला

शेअर बाजार

शेअर बाजारला मोदी सरकार २.० चा पहिला अर्थसंकल्प पसंत पडल्याचे दिसत नाही. दुपारी २.४० नंतर सेन्सेक्स २२५.५६ अंकांनी घसरुन ३९,६८२.५० वर आला. तर एनएसईचा निर्देशांक ८६.९५ अंकांनी घसरुन ११,८५८.८० वर आला. 

अर्थसंकल्पाचा कल लक्षात येताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीकडे घसरण झाली. दुपारी १.२९ वाजता सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सर्वांत मोठी घसरण झाली. 

तत्पूर्वी, निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण सुरू करताच एका तासाच्या आतच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. विशेष म्हणजे अर्थसंकल्पाचे सादरीकरण होण्याच्या काही तास आधीच सेन्सेक्सने ४०,०००चा आकडा गाठला होता.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकरासंदर्भातील कामांसाठी पॅनकार्डसोबत आधारकार्डही ग्राह्य धरण्याचे जाहीर केले. याचा अर्थ जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल आणि तुम्हाला प्राप्तिकर विवरणपत्र (रिटर्न) भरायचे असेल, तर तुम्ही आधार कार्डचा वापर करू शकता. यासोबतच करांसंदर्भातील इतर कामांसाठीही पॅनकार्डसोबतच आधारकार्डही ग्राह्य धरले जाणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Budget Session 2019 sensex today 5 july 2019 stock market doesnt like union budget 2019 sensex losses