केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्राप्तीकराबरोबरच ग्रामीण भागासाठी आणि कृषी क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. शेतकरी वर्ग, सामान्य जनता, नोकरदार, व्यावसायिक अशा वेगवेगळ्या गटातील लोकांसाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर ठरेल, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी केला आहे.
Budget 2020 : ग्रामीण आणि शहरी भारताला जोडणारा अर्थसंकल्प
मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी येण्याच्या दृष्टिने अर्थसंकल्पात पावले उचलण्यात आली असून हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. तरुणांच्या रोजगारावरही लक्षकेंद्रीत केले असून बेरोजगारीवर तोडगा काढणारा अर्थसंकल्प असल्याचे मोदींनी म्हटले आहे. पाहूयात अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या क्षेत्रासंदर्भातील वार्तांकन एका नजरेत...