पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Union budget 2020: ३ वर्षांत दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे; ९००० किमी इको कॉरिडॉर

महामार्गाचे संग्रहित छायाचित्र

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना देशात पायाभूत सुविधांच्या कामांना गती देणार असल्याचे सांगितले. यात ९००० किमीचे इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि २५०० किमीचे नियंत्रित महामार्ग करणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर येत्या ३ वर्षांत दिल्ली-मुंबई महामार्ग तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Budget 2020 : काय स्वस्त, काय महाग?

त्याचबरोबर किनाऱ्यालगत २००० किमीचा महामार्ग तयार केले जाणार आहेत. महामार्गाच्या कामांना गती देण्यात आली आहे. यामध्ये २५०० किमीचा नियंत्रित महामार्ग असेल. ९००० किमीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर, २००० किमी किनाऱ्यालगतचा महामार्ग तयार केला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

येत्या ३ वर्षांत दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे पूर्ण केला जाणार आहे. यामुळे केवळ १२ तासांत रस्ते मार्गे मुंबईला जाता येईल. त्याचबरोबर चेन्नई प्रकल्पही लवकरच सुरु केला जाणार आहे. 

तरुणांचा भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

अर्थव्यवस्था वाढीसाठी चांगल्या महामार्गाचे जाळे असणे आवश्यक आहे. शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात महामार्गासाठी २०२४-२५ पर्यंत १९.६३ लाख कोटींची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

मागील पाच वर्षांच्या (२०१४-१५ ते २०१८-१९) तुलनेत रस्ते आणि महामार्गाच्या कामांसाठी तिप्पट गुंतवणूक झाली आहे. मार्च २०१९ पर्यंत ५९.६४ लाख किमीचे रस्ते, १.३२ लाख किमी लांबीचे रस्ते तयार झाले आहेत.

बँक ठेवीदारांना मोठा दिलासा, ठेवींवर आता पाच लाखांचा विमा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Budget 2020 Highways development to be accelerated including 9k km eco corridor Delhi Mum expressway in 3 yrs