पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Union Budget 2020:निर्मला सीतारामन यांचं भाषण ठरलं रेकॉर्ड ब्रेक,पण..

निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवार मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी दिलेले अर्थसंकल्पीय भाषण आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण ठरले आहे. त्यांनी जवळपास २ तास ४० मिनिटे भाषण केले. त्यांनी सर्वात अधिकवेळ भाषण करण्याचा स्वत:चा अनोखा विक्रम मोडीत काढून नवा विक्रम प्रस्थापित केला. अर्थसंकल्पातील दोन पानांचे वाचन बाकी असताना त्यांना भाषण थांबवावे लागले. अस्वस्थ वाटू लागल्याने अखेर त्यांना अर्थसंकल्प पटलावर सादर करण्याची वेळ आली. 

Budget 2020: २.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही - अर्थमंत्री

यापूर्वी २००३ मध्ये माजी अर्थमंत्री जसवंत सिंग यांनी जवळपास २ तास १३ मिनिटांचे भाषण केले होते. निर्मला सीतारामन यांनी ५ जुलैला सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी जसवंत सिंग यांच्यापेक्षा अधिवेळ म्हणजे २ तास १७ मिनिटे भाषण केले होते. आज त्यांनी यापेक्षाही अधिक वेळ भाषण केले. दिवंगत भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१४ मध्ये २ तास १० मिनिटांचे भाषण केले होते. यावेळी प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांनी चार मिनिटांची विश्रांतीही घेतल्याचेही पाहायला मिळाले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Union budget 2020 finance minister Nirmala Sitharaman break all record A brief history of budget speeches in India