पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर्थिक सर्व्हेने ५ हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा रोडमॅप तयार केलाः मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवाल २०१८-१९चे कौतुक करताना हा भारताचा पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचा एक रोडमॅप तयार केल्याचे म्हटले आहे.  

पंतप्रधान मोदी यांनी टि्वट करताना म्हटले आहे की, आर्थिक पाहणी अहवाल २०१९ ने पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचा हा एक रोडमॅप आहे. यामध्ये सामाजिक क्षेत्राची प्रगती आणि नव्या औद्योगिक आणि ऊर्जा सुरक्षेतून होणाऱ्या फायद्यांना अधोरेखित केले आहे. 

सरकारने चालू आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये आर्थिक वृद्धी तर ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये सकल घरगुती उत्पादनाचा (जीडीपी) वृद्धी दर पाच वर्षाच्या निचांकी स्तर ६.८ टक्के राहिला होता. आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे की, पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला २०२५ पर्यंत ८ टक्क्यांनी जीडीपीचा वृद्धी दर कायम ठेवावा लागेल.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Budget 2019 PM Modi says Economic survey created road map of 5 billion dollar economy