पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीकडे विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता

निर्मला सीतारामन

सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्तेत आल्यानंतर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या शुक्रवारी, ५ जुलै रोजी लोकसभेत मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडला जाईल. या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी आणि गुंतवणूक वाढीसाठी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जाण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यासाठी बांधकाम क्षेत्र, छोटे आणि मध्यम उद्योग, सेवा क्षेत्र याच्यावर विशेष लक्ष दिले जाईल.

तिहेरी तलाक विधेयकावरून तृणमूलच्या संभाव्य भूमिकेने भाजपला फायदा

मंदावलेला आर्थिक विकास आणि वाढती बेरोजगारी ही सध्याच्या मोदी सरकारपुढील सर्वात मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे त्यावर उपाययोजना करणे याला सरकारकडून अर्थसंकल्पात प्राधान्य दिले जाईल. बांधकाम क्षेत्रातील मरगळ घालवून त्यामध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी सरकार विशेष प्रयत्नशील असेल. कारण की बांधकाम क्षेत्राला चालना मिळाल्यास एकूण २६९ वेगवेगळ्या पूरक उद्योगांना चालना मिळते. ज्यामध्ये स्टील, सिमेंट, काच, प्लॅस्टिक, प्लम्बिंग यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कृषि क्षेत्रानंतर सर्वाधिक कामगार हे बांधकाम क्षेत्रामध्येच कार्यरत आहेत. ज्यामध्ये कुशल आणि अकुशल या दोन्ही प्रकारच्या कामगारांचा समावेश होतो.

...काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी यांची वर्णी लागण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे यामध्ये लोकप्रिय घोषणांपेक्षा अर्थव्यवस्था मजबूत कऱण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल, असे सूत्रांकडून समजते. अर्थसंकल्पात जल व्यवस्थापनासाठीही महत्त्वाची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. या सरकारमध्ये पहिल्यांदाच जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:union budget 2019 Investment push jobs likely focus of first budget of Modi govt second term