पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Union Budget 2019 : काय सांगता! पॅनकार्ड नाही, हरकत नाही...

पॅनकार्ड

पॅनकार्ड हे प्रत्येक करदात्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज आहे. कोणत्याही मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड असणे आवश्यक असते. जर तुमच्याकडे पॅनकार्डच नसेल, तर तुमचा व्यवहार खोळंबून राहू शकत होता किंवा पूर्णच होऊ शकत नव्हता. बँकेत किंवा कोणत्या आर्थिक संस्थेत सर्वात आधी पॅनकार्डची मागणी केली जात होती. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात महत्त्वाची घोषणा केली आहे. यापुढे पॅनकार्ड नाही म्हणून कोणत्याही करदात्याचे अडून राहणार नाही.

... असा वाचवा तुमचा प्राप्तिकर

निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकरासंदर्भातील कामांसाठी पॅनकार्डसोबत आधारकार्डही ग्राह्य धरण्याचे जाहीर केले. याचा अर्थ जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल आणि तुम्हाला प्राप्तिकर विवरणपत्र (रिटर्न) भरायचे असेल, तर तुम्ही आधार कार्डचा वापर करू शकता. यासोबतच करांसंदर्भातील इतर कामांसाठीही पॅनकार्डसोबतच आधारकार्डही ग्राह्य धरले जाणार आहे.

Budget 2019 डबल धमाका! इलेक्ट्रिकल वाहनांसह गृहकर्जदाराला 'गिफ्ट'

देशातील १२० कोटी लोकांकडे आधार कार्ड असल्यामुळे यापुढे आधार कार्डचा वापर करूनही करदाचे आपली करांसंदर्भातील विविध कामे विशेषतः प्राप्तिकरा संदर्भातील कामे करू शकणार आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:union budget 2019 Finance Minister Nirmala Sitharaman proposes PAN card and Aadhar card interchangeable file returns by quoting Aadhar number