पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Union Budget 2019 : आधीच सोने महाग, त्यात सीमाशुल्कात वाढ

सोने महागणार

सोन्यातील गुंतवणक ही अर्थशास्त्राच्या भाषेत 'डेड इन्व्हेस्टमेंट' म्हणून गणली जाते. कोणताही अर्थतज्ज्ञ सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला सहसा देत नाही. पण भारतीय मानसिकतेत सोन्याला मोठे महत्त्व आहे. विशेषतः सामान्य महिला वर्गामध्ये सोन्याच्या दागिन्यांची असलेली ओढ यत्किंचितही कमी झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सादर केलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्क वाढविण्याचे जाहीर केले. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील सीमाशुल्क १० टक्क्यांवरून १२.५ टक्के करण्याचे त्यांनी जाहीर केले. सीमाशुल्कात वाढ केल्यामुळे सोन्याची खरेदी महागणार आहे.

हे आहेत अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

गेल्या काही महिन्यांपासून देशात सोन्याच्या किंमती सातत्याने वाढताहेत. काही दिवसांपूर्वीच सोन्याचे दराने विक्रमी आकडा गाठला होता. त्यातच आता सीमाशुल्कात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोने आणखी महागणार हे निश्चित आहे. आपल्याकडे सणासुदीला, लग्न-समारंभात सोने खरेदी करण्याची आणि सोन्याचे दागिने घालण्याची प्रथाच आहे. त्यामुळे मंदीच्या काळातही सोन्याची मागणी कायम राहत असल्याचे दिसून आले आहे. 

सोन्याच्या दरात वाढ होणार असल्यामुळे काही प्रमाणात महिलांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ शकते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Budget 2019 Finance Minister Nirmala Sitharaman proposed to increase custom duty on gold