पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचा परिणामः अमेरिकेत १९३० च्या मंदीनंतरची सर्वाधिक बेरोजगारी

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेत जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार बेरोजगारीचा दर १९३० च्या महामंदीनंतर सर्वाधिक झाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक सहापैकी एका अमेरिक कामगाराला नोकरीतून काढण्यात आले आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन संसदेने सुमारे ५०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने सांगितले की, मागील आठवड्यात ४४ लाखांहून अधिक लोकांनी बेरोजगारीच्या लाभासाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर मागील पाच आठवड्यात सुमारे २.६ कोटी लोकांनी यासाठी अर्ज केला आहे. 

कोरोनाचा वेग मंदावला, काही आठवड्यांत मात करण्याची आशा: हर्षवर्धन

रॅली काढून व्यापार पुन्हा सुरु करण्याची मागणी

अमेरिकेसाठी सर्वांत वाईट बातमी म्हणजे न्यूयॉर्क राज्यात तब्बल २७ लाख लोकांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. तेथील आरोग्य आयुक्त ऑक्सिरिस बारबोट म्हणाले की, फक्त न्यूयॉर्क शहरात ८६ लाख लोकसंख्येपैकी १० लाखांहून अधिक लोक संक्रमित असू शकतात. अमेरिकत लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. अनेक राज्यांच्या राजधानीत नाराज लोकांनी रॅली काढून पुन्हा व्यापार सुरु करण्याची मागणी केली आहे. 

निकोटिनमुळे कोरोनाचे संक्रमण रोखले जाऊ शकते, नवे संशोधन

काही राज्यांनी तर आरोग्य अधिकाऱ्यांनी इशारा देऊनही लॉकडाऊनमध्ये ढिलाई देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात असे करणे घाईचे ठरु शकते. 

जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूमुळे जगभरात १.९० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एक लाखांहून अधिक मृत्यू हे युरोपमध्ये झाले आहेत. तर अमेरिकेत सुमारे ५० हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजार पार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Unemployment rate highest in America due to corona pandemic after Great recession of 1930