पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थसंकल्पापूर्वीच लागू होतील हे बदल

अर्थसंकल्पापूर्वीच लागू होतील हे बदल

एक फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. परंतु, अर्थसंकल्पापूर्वीच सामान्य व्यक्ती ते खासदारांसाठी नवे बदल लागू होणार आहेत.

विमा पॉलिसी महागणार

एलआयसी ३१ जानेवारीपासून जीवन आनंद, जीवन उमंगसारख्या २३ पॉलिसी बंद होणार आहेत. यूलिप पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठीची वेळ दुप्पट आणि पारंपारिक पॉलिसीसाठी ५ वर्षे होईल. पेन्शन प्लॅनच्या परिपक्वतावेळी ३३ टक्के ऐवजी ६० टक्के पैसे काढू शकाल. पॉलिसीच्या पाच वर्षांनंतर २५ टक्के पैसे काढता येईल. या बदलानंतर नवीन पॉलिसी १५ टक्के महाग होतील. 

विप्रोच्या सीईओंचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे पायउतार

डिजिटल व्यवहाराची सुविधा न दिल्यास दंड

एक फेब्रुवारीपासून डिजिटल आर्थिक व्यवहाराची सुविधा न देणाऱ्या कंपन्यांना दररोज पाच हजार रुपयांच्या हिशोबाने दंड लावण्यात येईल. सीबीडीटीनुसार ५० कोटी रुपये उलाढाल असलेले दुकान, कंपन्या आणि व्यवसायासाठी हे अनिवार्य असेल. 

संसदेतील कँटिनचे जेवण महागले

अर्थसंकल्पाबरोबरच संसदेतील कँटिनमधील जेवणावर दिली जाणारी सबसिडी बंद होणार आहे. ५ डिसेंबरला याची घोषणा करण्यात आली होती. संसदेत खाण्याचा खर्च दरवर्षी सुमारे १७ कोटी रुपये इतका होता. 

जीएसटीमध्ये ई-बिलिंगला सुरुवात

जीएसटीमध्ये १०० कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या ई-इनवायसिंग (ई-बिलिंग) सुरु करतील. यामध्ये क्यूआर कोड जनरेट होईल. १ एप्रिलपासून असे न करणाऱ्यांना दंड लागू होईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाचे ठरणारे पाच मुद्दे

स्वयंपाकाचा गॅस-विमान इंधन महाग होण्याची शक्यता

कच्च्या तेलाच्या दरात मागील आठवड्यातील वाढ पाहता स्वयंपाकाचा गॅस आणि विमानाचे इंधनाचे (एटीएफ) दरही वाढू शकतात. दर महिन्याच्या अखेरीस नव्या दरांची घोषणा केली जाते. ३१ जानेवारीला रात्री नवीन किंमत जाहीर होईल. 

जुन्य अँड्राएडवर व्हॉट्सअप बंद

टाटा नेक्सन ईव्ही लाँच, एकदा चार्ज केल्यानंतर धावेल इतके किमी


अँड्राएडच्या २.३.७ या व्हर्जन आणि आयओएस ८ ऑपरेटिंग सिस्टिमच्या जुन्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप सपोर्ट करणार नाही. यूजर्स व्हॉट्सअपवर नवीन अकाऊंट उघडू शकणार नाहीत.