पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीडीपीची ५ टक्क्यांवर घसरण, मागील ६ वर्षांचा नीचांक

जीडीपी ५.८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर, मागील ६ वर्षांचा नीचांक

आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर ५ टक्क्यांवर घसरला आहे. मागील तिमाहीत तो ५.८ टक्के होता. तर तिसऱ्या तिमाहीत विकास दर हा ६.६ टक्के होता. पहिल्या तिमाहीत जीव्हीए ४.९ टक्के राहिला. गेल्या वर्षी याच काळात जीडीपी ८.२ टक्के होता.

हा विकासदर मागील ६ वर्षांतील सर्वांत कमी आहे. विकास दरात मागील पाचव्या तिमाहीपासून घसरण सुरु आहे. बांधकाम क्षेत्राची वाढ ७.१ टक्क्यांवरुन घटून ५.७ टक्केपर्यंत आली आहे. तर अर्थ आणि रिअल इस्टेट क्षेत्रात ५.९ टक्के वाढ राहिली. 

खाण क्षेत्रातील वाढ २.७ टक्के आहे. व्यापार आणि हॉटेल क्षेत्रातील वाढ पहिल्या तिमाहीत ७.१ टक्के होती. यामध्ये थोडी वाढ झाली आहे. वीज क्षेत्रातील वाढ ४.३ टक्क्यांवरुन ८.६ टक्के इतकी वाढली.

आता देशात केवळ १२ राष्ट्रीय बँका, निर्मला सीतारामन यांची घोषणा

उत्पादन क्षेत्रातील वाढ ३.१ टक्क्यांवरुन घटून ०.६ टक्के झाली आहे. मागील तिमाहीत जीव्हीए ५.७ टक्के होता. जो आता घटून ४.९ टक्के झाला आहे. विकासदरातील घसरणीमुळे व्याज दरात कपातीची शक्यता आणखी वाढली आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत उद्योग क्षेत्राची वाढ ४.२ टक्क्यांवरुन घटून २.७४ टक्क्यांवर पोहोचली आहे. कृषी क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी क्षेत्राची वाढ वजा ०.१ टक्क्यांवरुन २ टक्के झाली आहे. मागील वर्षी कृषी क्षेत्रातील वाढ याच तिमाहीत ५.१ टक्के होती. 

जीडीपीचे हे आकडे पाहता सरकारची चिंता वाढणार आहे. तर आरबीआयवर विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी व्याज दर कमी करण्याचा दबाव वाढेल. मागील क्रेडिट पॉलिसीमध्ये आरबीआयने ०.३५ टक्क्यांनी रेपो रेट घटवले होते.