पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंदीची स्थिती : ऑटोमोबाईल क्षेत्रातील लाखो कामगारांना एप्रिलपासून कामावरून काढले

ऑटोमोबाईल क्षेत्र

मोटारसायकली आणि मोटारी यांच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये सध्या उत्पादन बंद झाले आहे तर काही कंपन्या आठवड्यातील दोन ते तीन दिवस बंद (ले ऑफ) ठेवण्यात येत आहेत. 

या क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमोबाईल क्षेत्र, छोट्या भागांचे उत्पादन करणारे कारखाने आणि वितरकांनी एप्रिलपासून आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. 

सुषमा स्वराज यांना श्रद्धांजलीसाठी स्मृती इराणी यांचे भावूक ट्विट

मोटारी आणि मोटारसायकली तयार करणाऱ्या कंपन्यांनी १५ हजार कामगारांना, छोट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी एक लाख कामगारांना कामावरून काढले आहे तर उर्वरित नोकऱ्या या वितरक क्षेत्रातील कामगारांच्या गेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. कंपन्यांमध्ये किंवा कारखान्यात जे कामगार तात्पुरत्या नोकरीवर होते. त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती रॉयटर्सला मिळाली आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रापुढील आव्हानांवर मार्ग काढणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांनी करांमध्ये मोठी सवलत देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर ग्राहकांना आणि वितरकांना सहजपणे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले गेले पाहिजे. जेणे करून मागणी वाढेल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. 

रेपो दरात सलग चौथ्यांदा कपात, कर्जे स्वस्त होण्याची शक्यता

ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक विनी मेहता यांनी ऑटोमोबाईल क्षेत्र सध्या मंदीच्या स्थितीतून जात असल्याचे सांगितले.