पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सायरस मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

सायरस मिस्त्री

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्याचा राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. अर्थात आपण टाटा सन्सचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारणार नसल्याचे सायरस मिस्त्री यांनी आधीच स्पष्ट केले आहे. लवादाच्या निर्णयाविरोधात टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

जेएनयू हिंसाचार: ३ प्राध्यापकांची दिल्ली हायकोर्टात धाव

सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्याचे लवादाचा आदेश कायद्याच्या कक्षेत न बसणारा आणि कंपनी कायद्याला धरून नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी चार आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे. १८ डिसेंबर रोजी लवादाने दिलेल्या निर्णयाला टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवून त्याजागी एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपल्याला हटविल्यानंतर या प्रकरणी सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे तक्रार दाखल केली होती. त्याच खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला होता.

'राज्यातील शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार'

राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने दिलेला निर्णय गोंधळ निर्माण करणारा आहे. देशातील महत्त्वाच्या कॉर्पोरेट कंपन्यांचे काम कशा पद्धतीने चालायला हवे यामध्ये यामुळे गोंधळ निर्माण होतो आहे, असा युक्तिवाद टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.