पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा: टाटा ट्रस्टकडून तब्बल ५०० कोटींची मदत

रतन टाटा

कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी सामजिक संस्था, खासगी कंपन्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तीमत्वांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.  टाटा ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी तब्बल ५०० कोटींची मदतीची घोषणा केली आहे. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, करोनाचं संकट हे मानवासमोरील कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाने यापूर्वी कठिण प्रसंगात देशासाठी आवश्यक योगदान दिले आहे. आतापर्यंतचा हा देशासमोरील सर्वात मोठा प्रसंग असून या संकटात टाटा ट्रस्टकडून ५०० कोटींची मदत करण्यात येईल. 

व्हेंटिलेटर्सच्या उत्पादन वाढीसाठी मारुती सुझुकी करणार मदत

सर्व समुदायाचे सशक्तीकरण आणि सुरक्षितेसंदर्भातील प्रतिज्ञाचे पालन करत टाटा ट्रस्टकडून कोरोनाच्या संकटासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. कठिण परिस्थितीत सर्वात पुढे येऊन काम करणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, टेस्टिंग किट आणि अन्य आवश्यक उपकरणासाठी हा निधी देणार आहोत, असा उल्लेखही परिपत्रकात करण्यात आला आहे. चीनमधील वुव्हामधून भारतात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे.

कोरोनाविरोधातील लढाईसाठी अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने संपर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशाला मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक संघटना आपापल्या परिने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करत आहेत. काही खासगी कंपन्यांनी शेअर्सच्या स्वरुपातही मदत दिली आहे. टाटा ट्रस्टकडून झालेली घोषणाही आतापर्यंतची एका समूहाकडून मिळालेली सर्वाधिक मदत आहे.