पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टाटा स्कायने सुरु केली ब्रॉडबँड सेवा, ५९० मध्ये अमर्यादित डेटा

टाटा स्काय

टाटा स्काय भारतात 'डायरेक्ट टू होम' (डीटीएच) सेवा देणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. जियो गिगा फायबरनंतर टाटा स्कायने २१ शहरांत ब्रॉडबँड सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या युजर्सला ब्रॉडबँडच्या अमर्यादित डेटा प्लॅनची ऑफरही देऊ केली आहे.

५९० रुपयांत मिळणार ब्रॉडबँड प्लॅन

जियो गिगा फायबर ब्रॉडबँडमध्ये आल्यामुळे टाटा स्कायनेही यात उडी घेतल्याचे सांगण्यात येते. जियो गिगा फायबर लवकरच वायफाय, केबल आणि लँडलाइन सेवा सुरु करणार आहे. ते लक्षात घेता टाटा स्कायने ५९० रुपयांत नवा प्लॅन आणला आहे. 

जियोला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने आणला १२९ रुपयांचा प्लॅन

ही आहे ऑफर

५९० रुपयांत टाटा स्कायने १६ एमबीपीएसच्या स्पीडबरोबरच एक महिन्यासाठी अनलिमिटेड डेटा ऑफर केला आहे. यामध्ये ग्राहकांना राऊटर मोफत दिला जाईल. टाटा स्कायचा दुसरा प्लॅन हा ७०० रुपयांचा आहे. यामध्ये २५ एमबीपीएसच्या स्पीडबरोबर अमर्यादित डेटा मिळत आहे. तर ५० एमबीपीएस प्लॅनसाठी टाटा स्काय ६०० रुपये शूल्क घेईल. तसेच १०० एमबीपीएस प्लॅनसाठी १३०० रुपये शूल्क आकारण्यात येईल. 

या शहरात मिळत आहे सेवा

टाटा स्काय सध्या मुंबई, जयपूर, दिल्ली, नोएडा, सुरतसारख्या शहरांत सेवा देत आहे. कंपनीच्या मते लवकरच इतर शहरांमध्येही सेवा सुरु होणार आहे.

व्होडाफोन-Idea ची मोठी ऑफर, रोज मिळेल ४०० एमबीचा अतिरिक्त डेटा