पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टाटा नेक्सन ईव्ही लाँच, एकदा चार्ज केल्यानंतर धावेल इतके किमी

टाटा नेक्सन ईव्ही लाँच, एकदा चार्ज केल्यानंतर धावेल इतके किमी

टाटा कारचे चाहते असलेल्यांसाठी एक खूशखबर आहे. टाटा मोटर्सने मंगळवारी आपली सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही नेक्सनचे इलेक्ट्रिक व्हेरियंट (Tata Nexon EV) बाजारात लाँच केली आहे. देशभरातील शोरुममध्ये नेक्सनची किंमत १३.९९ लाख रुपयांपासून (एक्स शोरुम किंमत) सुरु होणार आहे.

बोर्डिंग गेटपर्यंत जाणे ही प्रवाशांची जबाबदारी, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

टाटा मोटर्सने मागील वर्षी डिसेंबरमध्ये नेक्सनचे इलेक्ट्रिक व्हेरियंटचे अनावरण केले होते. टाटा सन्स समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी म्हटले की, येत्या दोन वर्षांत टाटा मोटर्स आणखी चार इलेक्ट्रिक मॉडेल सादर करण्याचे नियोजन आहे. यात दोन एसयूव्ही, एक हॅचबॅक आणि एक सेदान कारचा समावेश आहे. 

नवी संकल्पना, गाड्या अनेक मात्र मोटार पॉलिसी एक!

नेक्सन ईव्हीच्या लाँचिंगच्या वेळी आयोजित कार्यक्रमात टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा हेही उपस्थित होते. कंपनीने म्हटले आहे की, नेक्सन एकदा चार्ज केल्यानंतर ३१२ किमी धावेल. वेगवान चार्जिंगची सुविधा, दीर्घकाळ बॅटरी बॅकअप आणि आधुनिक सुरक्षा वैशिष्टांनी ती युक्त आहे. नेक्सनची इलेक्ट्रिक कार तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होईल आणि ही सर्व ६० अधिकृत डिलर्सकडे मिळेल.

मारुतीच्या गाड्या महागल्या, नवे दर अमलात

टाटा मोटर्सने म्हटले की, कंपनी टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा ऑटोकॉम्प, टाटा मोटर्स फायनान्स आणि क्रोमासारख्या कंपन्याबरोबर काम करत आहे. देशात ईव्हीला वेग येण्यासाठी टाटा यूनिवर्स, ई-मोबिलिटी इकोसिस्टिमची निर्मिती करत आहे.

पोस्टात बचत खातं असेल तर जाणून घ्या हे नियम