पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMC बँक आरोपींबाबत हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

पीएमसी बँक घोटाळा

पंजाब एँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश आणि सारंग वाधवान यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे स्थगिती आदेश दिले.

घड्याळवाले आता आमचे पार्टनर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर स्तुतिसुमने

या प्रकरणी युक्तिवाद करताना केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले, पीएमसी बँक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने वेगळाच निकाल दिला आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन आरोपींची सुटका करण्याचे आणि त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिले. दोन्ही आरोपी पीएमसी बँकेत व्यवस्थापनात महत्त्वाच्या जागी होती. उच्च न्यायालयाने दिलेला निकाल अनपेक्षित आहे. केवळ एका जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला असल्याचे तुषार मेहता यांनी सांगितले.

'रयतेच्या राज्यासाठी शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्माची गरज नाही'

राकेश आणि सारंग वाधवान हे दोघेही घोटाळ्यातील प्रमुख कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट एँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे प्रवर्तक आहेत. त्यांची या घोटाळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.