पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टेट बँकेच्या तिमाहीतील नफ्यात तिप्पट वाढ, कारण की...

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँकेच्या तिमाहीतील नफ्यात तीन पट वाढ झाली आहे. स्टेट बँकेने आपल्या जीवन विमा विभागाचा काही हिस्सा विकला आहे. त्याचबरोबर बँकेची इतर आर्थिक स्रोतांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे बँकेच्या नफ्यात इतकी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

बर्थडे बॉय मिथुनची हॅट्ट्रिक, शाहरुखचीही शिकार

सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये बँकेचा निव्वळ नफा ३०.१२ अब्ज रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. याआधी गेल्या आर्थिक वर्षांच्या याच तिमाहीमध्ये तो ९.४५ अब्ज रुपये इतका होता. काही आर्थिक जाणकारांनी बँकेचा नफा २१.२८ अब्ज रुपये इतका असेल, असे म्हटले आहे.

आदित्य, आता करून दाखवा; #AadityaTeraVaada ट्रेंडमध्ये

तिमाहीच्या निकालांनंतर बँकेच्या शेअर्सच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बँकेचे शेअर्स ६ टक्क्यांनी वाढले. कर्जाची वसुली हा इतर बँकांप्रमाणे स्टेट बँकेपुढीलही महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे बँकेच्या नफ्यावर परिणाम होत आहे.