पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्पाईसजेटने कमाविला रेकॉर्डब्रेक नफा!

स्पाईसजेट कंपनीची विमाने

एकीकडे हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपन्या अडचणीतून जात असताना दुसरीकडे देशातील स्पाईसजेट विमान कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जूनमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत रेकॉर्डब्रेक नफा कमाविला आहे. अर्थात हवाई वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा इतर स्रोतांमधून जास्त पैसे मिळाल्यामुळे कंपनीने रेकॉर्डब्रेक नफा कमाविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीला ३८.१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. पण यावेळी २६१.७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. 

जॅग्वारऐवजी BMW भेट दिली म्हणून तरुणाने ती चक्क नदीत फेकली!

बोईंग कंपनीची स्पाईसजेटला विकलेली ७३७ मॅक्स विमाने गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक दोषांमुळे जमिनीवर आहेत. याचा मोबादला म्हणून बोईंगकडून स्पाईसजेट विमान कंपनीला आर्थिक मोबदला दिला जात आहे. त्याचबरोबर स्पाईसजेटची स्पर्धक कंपनी जेट एअरवेज बंद पडल्यामुळे कंपनीकडील प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळेही कंपनीच्या नफ्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. 

पूरग्रस्तांच्या मदतकार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही - मुख्य सचिव

जूनमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनी २९९१.७० कोटी रुपयांचा महसूल कमावेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण प्रत्यक्षात कंपनीने ३१४५.२६ कोटी रुपयांचा महसूल कमाविला आहे. स्पाईसजेट कंपनीच्या महसुलात ३९.५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहीमध्ये मोबदला म्हणून बोईंगकडून स्पाईसजेटला ११४.१ कोटी रुपये मिळाले आहेत. ज्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली.