पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विश्लेषण : मागणीत तर घट झाली मग किरकोळ कर्जांचे प्रमाण का वाढले?

ग्राहकांकडून मागणीमध्ये गेल्या काळात घट झाली आहे

आर्थिक मंदी... हे दोन शब्द सध्या भारतात कुठे ना कुठे ऐकण्यात किंवा वाचण्यात येतातच. गेल्या १८ महिन्यांमध्ये देशाच्या आर्थिक आघाडीवर मागणी घटत गेल्यामुळे मंदीची स्थिती निर्माण झाली. पण या आकडेवारीची दुसरी बाजू तुमच्या-आमच्या सगळ्यानांच आचंबित करणारी आहे. एकीकडे देशातील ग्राहकांकडून मागणीमध्ये घट झालेली असतानाच दुसरीकडे वेगवेगळी किरकोळ कर्जे घेण्याचे प्रमाण मात्र वाढले आहे. जर ग्राहक कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी खर्च करण्यास तयार नसतील. तर मग वेगवेगळी किरकोळ कर्जे ते कशासाठी घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

CAA: भाजपच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

गेल्या काळात देशातील वाहन विकत घेण्याच्या, फ्लॅट विकत घेण्याच्या, हवाई प्रवास करण्याच्या मागणीमध्ये मोठी घट झाली आहे. याचाच अर्थ लोक आपल्याकडील पैसा खर्च करण्यास बिचकतात. खर्च करण्याचा निर्णय घेण्यासाठी जो विश्वास आवश्यक असतो, तो त्यांना वाटत नाही. त्यामुळे खर्च करण्याला ते टाळाटाळ करताहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंवरच खर्च केला जातो आहे. ग्राहकांच्या मागणीमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४.१ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. साधारणपणे वर्षभरापूर्वी हा निर्देशांक जितका होता त्याच्या निम्म्यावर तो आता येऊन थांबला आहे.

थोडे मागे वळून ग्राहकांच्या मागणीचा निर्देशांक गेल्या काही वर्षांमध्ये कसा घसरत गेला ते आकडेवारीवरून दिसते. २०१४-१५ मध्ये हा निर्देशांक ८.४ टक्के होता. २०१५-१६ मध्ये तो ७.९ टक्के झाला. २०१६-१७ मध्ये ८.२ टक्के झाला. २०१७-१८ मध्ये ७.४ टक्के झाला. २०१८-१९ मध्ये पहिल्या सहामाहीत तो ८.५ टक्के होता. तर दुसऱ्या तिमाहीत त्यात घसरण होऊन तो ७.७ टक्क्यांपर्यंत खाली आला. २०१९-२० या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो ४.१ टक्क्यांपर्यंत खाली आला. 

मागणीमध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरी किरकोळ कर्जे घेण्याच्या आकडेवारीमध्ये वाढ झाल्याचे दिसते. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये बँकांकडून दिल्या गेलेल्या किरकोळ कर्जाची टक्केवारी १६.६ टक्के इतकी आहे. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी कमी असतो.

एनआरसी आणि एनपीआर म्हणजे गरिबांवरील टॅक्स, राहुल गांधींचा आरोप

किरकोळ कर्जे घेण्याचे प्रमाण वाढण्यामागच्या कारणांमध्ये प्रामुख्याने बँकांव्यतिरिक्त इतर माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे हेच असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. अनेक जण बँकांव्यतिरिक्त इतर माध्यमातून कर्जे घेतात. पण सध्याच्या आर्थिक मंदीच्या स्थितीमध्ये खासगी स्वरुपाची कर्जे मिटविण्याला प्राधान्य दिले जाते किंवा उलट ही कर्जे लवकरात लवकर मिटविण्यासाठी कर्जदारांकडे तगदा लावला जातो. त्यामुळेच ही कर्जे फेडण्याला प्राधान्य द्यावे लागते, असे दिसून आले आहे.