पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता शाळेची फी सुद्धा या अ‍ॅपच्या साह्याने भरू शकणार

डिजिटल व्यवहार

अधिकाधिक लोकांनी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्यावे म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक उपाय योजले आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या पतधोरण आढाव्यावेळी बँकेने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आता मुलांच्या शाळेची फी सुद्धा ऑनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून भरता येऊ शकणार आहे. भारत बिल पेमेंट व्यवस्थेमध्ये आता शाळांनाही त्याचे खाते सुरू करता येणार आहे. जेणेकरून संबंधित शाळेचे पालक आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क (फी) या अ‍ॅपवर भरू शकतील. त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्यांनाही या अ‍ॅपवर खाते उघडता येऊ शकेल. जेणेकरून सोसायटीचा मासिक देखभाल खर्चही या अ‍ॅपवर भरता येऊ शकेल.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला ऑनलाईन चोरीचा फटका, २३ लाख चोरले

अधिकाधिक लोकांनी डिजिटल माध्यमातून व्यवहार करावेत. रोकड बाळगणे टाळावे म्हणून रिझर्व्ह बँकेने हे उपाय योजले असल्याचे या क्षेत्रातील उद्योजक विवेक बेळगावी यांनी सांगितले. बेळगावी भागीदार असलेल्या पी़डब्लूसी या कंपनीच्या माध्यमातून विविध बिलांचे पैसे भारत बिल पे अ‍ॅपवर भरता येऊ शकतात.

'राजनैतिक संबंध तोडण्याचा पाकिस्तानने फेरविचार करावा'

रिझर्व्ह बँकेने यासोबतच एनईएफटीची सेवा येत्या डिसेंबरपासून २४ तास देण्याची घोषणा केली आहे. सध्या सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेतच एनईएफटी करता येते. डिसेंबरपासून कोणत्याही एनईएफटीच्या माध्यमातून ग्राहकांना ऑनलाईन पैसे पाठविता येणार आहेत.