पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवी संकल्पना, गाड्या अनेक मात्र मोटार पॉलिसी एक!

मोटार विमा पॉलिसी

ज्या पद्धतीने आरोग्य विम्यामध्ये कुटुंबातील सर्वांचा समावेश करून एकच आरोग्य विमा पॉलिसी घेता येते. त्याच पद्धतीने येत्या काळात मोटार विमा पॉलिसीमध्येही एका व्यक्तीच्या मालकीच्या सर्व गाड्यांचा समावेश करता येईल. सध्या प्रत्येक गाडीसाठी स्वतंत्र विमा पॉलिसी काढावी लागते. पण आता एकाच पॉलिसीमध्ये सर्व गाड्यांचा समावेश करता येईल आणि गरजेप्रमाणे एखाद्या गाडीसाठी हा विमा वापरता येईल. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) याला मान्यता दिली आहे.

पाकिस्तानला १० दिवसांत हरवू शकतोः PM मोदी

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांकडून आर्थिक स्वरुपाची नवी उत्पादने आणण्यासाठी काही नव्या कल्पना मांडता येतील का, यासाठी विमा नियामक प्राधिकरणाने पुढाकार घेतला. त्याअंतर्गत सँडबॉक्स ही संकल्पना अमलात आणण्यात आली. याच सँडबॉक्स कल्पनेतून आता एकाच व्यक्तीच्या मालकीच्या गाड्यांसाठी एकच विमा पॉलिसी घेण्याचा प्रस्ताव पुढे आला आणि त्याला मान्यता देण्यात आली.

मुंबईत फटका गँगला रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून नवा उपाय

विमा नियामक प्राधिकरणाकडून विमा कंपन्यांना या स्वरुपाची नवी पॉलिसी प्रायोगिक तत्त्वावर ग्राहकांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्थात फेब्रुवारी ते जुलै या कालावधीमध्ये एका विमा कंपनीला या स्वरुपाच्या ५०००० पॉलिसी विकता येतील, असे बंधन घालण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावरील या योजनेतून पुढे येणाऱ्या निष्कर्षांवर ही योजना कायमस्वरुपी अमलात आणायची की नाही हे निश्चित केले जाईल, असे विमा नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे.