पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इनकॉग्निटो मोडमध्येही काहीवेळा तुमचा माग काढणे शक्य, गुगलकडून लवकरच ब्राऊजरमध्ये सुधारणा

इनकॉग्निटो मोड

वेब ब्राऊजरमध्ये तुम्ही काय करता, कोणत्या साईटला भेट देता, तिथे काय बघता याची माहिती काही कंपन्यांकडून जमविली जाते आणि त्याचा वापर केला जातो. यावर उपाय म्हणून गुगल क्रोम वेब ब्राऊजरमध्ये इनकॉग्निटो मोड आणण्यात आला. इनकॉग्निटो मोडमध्ये वेब ब्राऊजर सुरू केल्यावर त्यातील माहितीचा माग काढला जाऊ शकत नाही. पण गुगलच्या क्रोम ब्राऊजरमधील इनकॉग्निटो मोड त्रुटी असून, काही कंपन्यांकडून इनकॉग्निटो मोडमध्येही ग्राहकांच्या कामाची माहिती घेतली जाते, हे दिसून आल्यामुळे आता गुगलने ही त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली आहेत.

बाबरी मशीद प्रकरणी ९ महिन्यांत निकाल द्या-सर्वोच्च न्यायालय

क्रोम ब्राऊजरच्या नव्या सुधारणेमध्ये ही त्रुटी दूर केली जाणार आहे. येत्या ३० जुलै रोजी ही नवी सुधारणा ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. ग्राहकांना केवळ त्यांचे ब्राऊजर अपडेट करून घ्यावे लागेल. 

गुगलच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, ग्राहक वेगवेगळ्या कारणांमुळे इनकॉग्निटो मोडमध्ये ब्राऊजरचा वापर करतात. काहींना आपण ब्राऊजरमध्ये नक्की काय करतोय, हे कोणालाही कळू द्यायचे नसते. काहींना आपल्या ब्राऊजरमधील हिस्ट्री तयार होऊ द्यायची नसते. तर काही जण सार्वजनिक ठिकाणी असलेले संगणक वापरत असल्यामुळे त्यांनाही आपण काय काय बघितले हे इतरांना कळू द्यायचे नसते. या सगळ्या कामासाठी इनकॉग्निटो मोड उपयुक्त असतो. 

पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा आधीच्या सरकारांमुळेच शक्य - प्रणव मुखर्जी

इनकॉग्निटो मोडमध्येच त्रुटी असल्याचे दिसल्यावर गुगलकडून त्यावर तातडीने उपाय शोधण्यात आला. नव्या बदलानंतर इनकॉग्निटो मोडमध्ये केलेली कोणतीही कामे कोणत्याही कंपनीला कळणार नाही किंवा त्याची माहिती कंपनीला कळू शकणार नाही. 

इनकॉग्निटो मोड म्हणजे काय?
गुगल क्रोम ब्राऊजरमध्ये इनकॉग्निटो मोड देण्यात आला आहे. जर ग्राहकांना त्यांच्या ब्राऊजरमधील कार्यकृती कोणत्याही कंपनीला कळू द्यायच्या नसतील किंवा ते ब्राऊजरवर काय काय करतात याची माहिती या क्षेत्रातील कंपन्याना उपलब्ध करू द्यायची नसेल तर इनकॉग्निटो मोड उपयोगी ठरतो. इनकॉग्निटो मोडमध्ये केलेले कोणतेही काम विपणन क्षेत्रातील कंपन्यांना समजत नाही. ग्राहकांची माहिती जमवून या कंपन्यांना त्यांच्यापुढे कोणत्याही ऑफर्स आणू शकत नाही. इनकॉग्निटो मोडमध्ये तुमचे ब्राऊजरमधील काम खासगीच राहते. ते कोणालाही समजत नाही. म्हणूनच अनेक जण गुगल क्रोममध्ये इनकॉग्निटो मोडमध्येच काम करतात.