पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून रिझर्व्ह बँकेने नोटांचा आकार कमी केला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या रुपातील नोटांचा आकार मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. याचे नेमके कारण काय याचा खुलासा खुद्द रिझर्व्ह बँकेकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. चलनी नोटा नागरिकांच्या पाकिटांमध्ये सहजपणे बसाव्यात, यासाठी त्यांचा आकार कमी करण्यात आल्याची माहिती बँकेकडून उच्च न्यायालयात देण्यात आली.

चांद्रयान २ साठी महत्त्वाचा क्षण, विक्रम लँडर शनिवारी चंद्रावर उतरणार

रिझर्व्ह बँकेची बाजू उच्च न्यायालयात मांडणारे वरिष्ठ वकील व्ही आर धोंड यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर चलनी नोटांचा आकार फार मोठा नाही. अमेरिकी डॉलरचा आकारही लहानच आहे. मात्र, भारतात याआधी वापरात असलेल्या चलनी नोटांचा आकार खूप मोठा होता. या नोटा नागरिकांच्या पाकिटामध्ये सहजपणे बसाव्यात, यासाठी त्यांचा आकार लहान करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणावर सुनावणी झाली. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड यांनी या संदर्भात एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. चलनी नोटा ओळखण्यात अंध व्यक्तींना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

सांगली, कोल्हापूरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; जिल्हा प्रशासन सज्ज

रिझर्व्ह बँकेच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर मुख्य न्यायाधीशांनी त्यावर हलके-फुलकेपणाने प्रतिक्रिया दिली. चलनी नोटांचा आकार लहान हवा, हे समजण्यासाठी इतकी वर्षे गेली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.