पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेअर बाजारात अच्छे दिन; सेन्सेक्स ४० हजार पार

शेअर बाजार

भारतीय शेअर बाजारमध्ये बुधवारी अच्छे दिन पाहायला मिळाले. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्स ४० हजाराच्या वर गेला आहे. निफ्टीमध्ये देखील तेजी दिसली. निफ्टी ११ हजार ८८० च्या वर गेला. गेल्या तिमाहीत काही देशांतर्गत कंपन्यांच्या जोरदार आर्थिक निकालामुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.

 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नरसंहार, ५ मजुरांची केली हत्या

मुंबई शेअर बाजारामध्ये सकाळी साडेनऊ वाजता सेन्सेक्समध्ये ११०.८६ अंकांनी म्हणजे ०.२८ टक्क्यांनी वाढ होत तो ३९ हजार ९४२ च्या आकड्यावर येऊन पोहोचला. तर राष्ट्रीय निफ्टीमध्ये ३७.४५ अंकांनी म्हणजे ०.३२ टक्क्यांनी वाढ होत ११ हजार ८२४ चा आकडा गाठला. दरम्यान, सेन्सेक्सने ४० हजारचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जून महिन्यानंतर सेन्सेक्समध्ये ही विक्रमी वाढ झाली आहे.

तिढा सुटणार? सेनेशी मिळतंजुळतं घेण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला