पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थमंत्र्यांच्या घोषणांनंतर मुंबई शेअर बाजारात उसळी

मुंबई शेअर बाजार

आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्राला बळ देण्यासाठी विविध उपाययोजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी जाहीर केल्यानंतर त्याचे सकारात्मक पडसाद लगेचच मुंबई शेअर बाजारात बघायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९०० अंकांनी वधारला. 

मोटार वाहन कायद्यात दंड वाढविण्याला अनेक राज्यांचा होकारच होता

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर लगेचच सेन्सेक्समध्ये वाढ झाली. मारुती, महिंद्रा एँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, येस बँक, टाटा स्टील, एल एँड टी, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या शेअरच्या भावात ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. 

बलात्काराचा आरोप असलेले स्वामी चिन्मयानंद यांना अटक

गेल्या काही महिन्यांपासून देशातील आर्थिक मंदीवरून विरोधक सरकारवर टीका करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी चर्चा करीत असून, टप्याटप्याने विविध उपाययोजना जाहीर करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध उपाय शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आले. ज्यामध्ये देशांतर्गत कंपन्यांवरील कॉर्पोरेट कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.