पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेअर बाजारात अच्छे दिन; सेन्सेक्स १,३१३ अंकांनी वधारला

शेअर बाजार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशांतर्गत कंपन्यांवरील कॉर्पोरेट कर कमी केल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर शेअर बाजारात शुक्रवारी असलेले सकारात्मक पडसाद सोमवारी देखील पहायला मिळाले. सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये १,३१३ अंकांनी वाढ होत ३९००० वर आला आहे. तर निफ्टीमध्ये देखील वाढ होत ११, ५०० अंकांवर पोहचला आहे.

चिदंबरम यांना भेटण्यासाठी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहार तुरुंगात

आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्राला बळ देण्यासाठी विविध उपाययोजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी जाहीर केल्या. ज्यामध्ये देशांतर्गत कंपन्यांवरील कॉर्पोरेट कर कमी करण्याचा निर्णयाची त्यांनी घोषणा केली. या निर्णयानंतर शेअर बाजारामध्ये अच्छे दिन पहायला मिळत आहेत. शुक्रवारी शेअर बाजारात सेन्सेक्सने १, ९२१ अंकांनी उसंडी मारली होती. 

VIDEO : चाहतीने I Love You ऋषभ म्हटल्यावर पुढे काय झाले पाहा...

दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारने देशांतर्गत कंपन्यांसाठी केलेल्या घोषणेमुळे शुक्रवारी शेअर बाजार तेजीत होता. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर लगेचच सेन्सेक्समध्ये वाढ झाली. मारुती, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, येस बँक, टाटा स्टील, एल अ‍ॅण्ड टी, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या शेअरच्या भावात ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. 

... म्हणून कंपनी करात कपात करून फारसा उपयोग नाही