पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेअर बाजारात 'अच्छे दिन', सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची उसळी

शेअर बाजारात तेजी

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या योजनांमुळे शेअर बाजारात तेजी आली आहे. सोमवारी गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या सकारात्मकतेमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८०० अंशांनी वधारला असून तो ३७ हजारर ५४४ वर पोहचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये २२७.७० अंशांनी वधारला. निफ्टी ११ हजारांचा टप्पा पार करुन ११ हजार ७० अंशांवर पोहचला.  

मंदी टाळण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा

आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था इतर राष्ट्रांच्या तुलनेत सुस्थित असल्याचे म्हटले होते. अर्थव्यवस्थेतील मरगळ भरुन काढण्यासाठी यावेळी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या होत्या. शेअर बाजारातील आजच्या उसळीमुळे बँकिंग आणि वित्त शेत्रातील शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील येस बँकस एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आणि कोटक बँकेच्या शेअर्समध्ये तेजी होती.

५ हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्था शक्यः प्रणव मुखर्जी

दुसरीकडे वाहन उद्योग क्षेत्रातील मरगळ अद्यापही कायम आहे. निफ्टी ऑटो निर्देशांकात हिरो मोटाकॉर्प, बजाज ऑटो आणि टाटा मोटर्स यासारख्या कंपन्यांचे व्यवहार नकारात्मक पातळीवरच आहेत. महिंद्राच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.