पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई शेअर बाजारात दिवाळी, सेन्सेक्स नव्या उंचीवर

शेअर बाजार

परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीत दाखवलेला उत्साह त्याला भारतातील गुंतवणूकदारांची मिळालेली साथ यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी बाजार सुरू झाल्यापासून सकाळच्या सत्रात बुधवारच्या तुलनेत २९३ अंकांनी वर आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक दिवसातील व्यवहारांमध्ये सर्वोच्च ४०३४४.९९ वर जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही गुरुवारी वाढ झाली असून तो सकाळच्या सत्रात ११,९०८.९० वर जाऊन पोहोचला. निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात ६४.८० अंकांची वाढ झाली. 

सत्तापदांच्या समान वाटपासाठी शिवसेना आग्रही, लढत राहण्याचे वचन

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्समध्ये वाढ झाल्याचा सर्वाधिक फायदा स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, आयटीसी, सनफार्मा, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सना झाला. या शेअरच्या भावामध्ये सुमारे २.६४ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसले.

भारती एअरटेल, ऍक्सिस बँक, महिंद्रा एँड महिंद्रा, पॉवरग्रीड आणि येस बँक या शेअर्सच्या भावामध्ये गुरुवारी सकाळी घसरण झाल्याचे दिसले. ही घट सरासरी ०.९२ टक्के इतकी होती.

IND vs BAN : हवेचा दर्जा खालावला, तरीही पहिला सामना दिल्लीतच होणार !

बुधवारी दुपारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२० अंकांनी वर जाऊन ४०,०५१ वर बंद झाला होता. ४ जून २०१९ नंतर पहिल्यांदाच सेन्सेक्स ४० हजारांच्या वर बंद झाला आहे.