पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Share Market: सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला

मंगळवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला.

केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेला जीडीपी वृद्धी दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स ७७० इतक्या  अंकाच्या घसरणीसह ३६,५६२.९१ वर तर निफ्टी २२५ अंकाच्या घसरणीसह १०,७९७ वर बंद झाला. 

 

शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ४१३ अंकांनी कोसळला

सकाळी १० वाजून ३२ मिनिटांनी सेन्सेक्स ४१३.५८ अंशांनी घसरणीसह व्यवहार करत होता. तर निफ्टीमध्येही १२९.३० घसरणीसह १०,८९३.९५ वर व्यवहार करत होता. मुंबई शेअर मार्केट, नॅशनल स्टॉक एक्ससेंज, परेदेशी मुद्रा बाजार यासह प्रमुख शेअर बाजार सोमवारी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बंद होते.  

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा अर्थव्यवस्थेला फटका : मनमोहन सिंग

'मुंबई स्टॉक मार्केट'मध्ये (बीएसई) सकाळी १५१.०३ अंकाच्या घसरणीसर ३७,१८१.७६ तर निफ्टी ६२.३ अंकाच्या वृद्धीने १०,९६० वर खुला झाला होता. शुक्रवारी शेअर बाजार सेन्सेक्स ३८३ अंकाच्या घसरणीसह ३७,०६८.९३ आणि निफ्टी ९८ अंकाच्या घसरणीसह १०,९४८.३० वर बंद झाला होता.