पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला

दिवसाच्या सुरुवातीलाच निर्देशांकात १४०० अंकांची मोठी घसरण

 मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीलाच निर्देशांकात १४०० अंकांची मोठी घसरण झाली. नव्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळाली. गेल्या आठवड्यातही सेन्सेक्समध्ये ११०७. ४१ अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात पडझड पहायला  मिळाली. 

कोरोनाची लक्षणे असलेला परदेशी रुग्ण ओडिशात हॉस्पिटलमधून पळाला

शेअर बाजार खुला होताच निर्देशांकात १४०० अंकाची मोठी घसरण  होऊन सेन्सेक्स ३७, ०११.०९ वर आला. येस बँकेचे शेअर २४. ६५ % नी गडगडले.  बँकेचा ताळेबंद हा चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचेही समोर आल्यानंतर  आरबीआयने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध घातले. त्यानंतर शुक्रवारी शेअर बाजार खुलताच येस बँकेचे शेअर्स पडले.

अपवादात्मक परिस्थितीतच ५० हजारांहून अधिक रक्कम काढण्यास परवानगी

निफ्टीदेखील ३६२ अंकानी घसरून तो १०, ०९६ वर आला आहे. वेदांता लिमिटेड, जेएसडब्ल्यू स्टीस, जी लिमिटेड, टाटा स्टील, इंडसइंड बँक, हिंडाल्को, टाटा मोटार्सचे शेअर्स १० % नी घसरले आहेत. गेल्या आठवड्यात कोरोनाचा मोठा फटका शेअर मार्केटला बसला होता. आता कोरोना आणि येस बँकेवर असलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा एकदा दिवसाच्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळाली. 

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय