पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेअर बाजारात सकारात्मक वातावरण, निर्देशांकात वधारणा

शेअर बाजार

गेल्या काही दिवसांपासून सतत चढउतार सुरू असेलल्या मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी दुपारनंतर वधारल्याचे दिसले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात अर्थात सेन्सेक्समध्ये १६०० अंकांनी वधारणा झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक यांच्या शेअरच्या दरात वाढ झाली.

Coronavirus: मुंबईत आणखी ४ नवे रुग्ण आढळले

कोरोना विषाणूच्या जागतिक संक्रमणानंतर शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होते आहे. त्या तुलनेत वधारणा होण्याची स्थिती खूप कमी वेळा आली आहे. पण बुधवारी निर्देशांक वधारला. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम जोखण्यासाठी सरकारने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या उपाययोजनांचे प्रतिबिंब बुधवारी शेअर बाजारात बघायला मिळाले. 

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात बुधवारी दुपारच्या सत्रात १५७३ अकांची वधारणा झाली. ही वधारणा ५.९० टक्के इतकी आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ४४४ अंकांनी वधारणा झाली. शेअर बाजारात ऍक्सिस बँकेच्या शेअरच्या दरात सर्वाधिक वाढ झाली. या बँकेचे शेअर सुमारे १५ टक्क्यांनी वधारणा झाली. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितली कोरोनाची पॉझिटिव्ह बाजू

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याचे अर्थव्यवस्थेवर संभाव्य काय परिणाम होतील, याची चाचपणी सध्या गुतंवणूकदारांकडून केली जात आहे. त्यानुसार ते गुंतवणूक करीत आहेत, असे एका गुंतवणूकदाराने सांगितले.