पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक्झिट पोल इॅम्पॅक्ट;सेन्सेक्समध्ये मागील १० वर्षांतील विक्रमी नोंद

शेअर बाजार (संग्रहित छायाचित्र)

भारतीय शेअर बाजारात मागील १० वर्षातील सर्वांत मोठी वाढ दिसून आली. त्याचबरोबर विक्रमी उच्चांकावर तो बंद झाला. एक्झिट पोलमध्ये मोदी सरकारला पूर्ण बहुमत मिळण्याचे संकेत मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. सोमवारी सेन्सेक्स १४२१ अंशाच्या उसळीसह ३९,३५२.६७ स्तरावर बंद झाला. तर निफ्टी ४२१ अंकांनी वाढला. निफ्टी ११,३८२ वर बंद झाला. 

तत्पूर्वी, सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्स ८८८.९१ अंशानी उसळून ३८,८१९.६८ वर आला. तर निफ्टीतही २८४.१५ अंशाची वाढ दिसून आली. निफ्टीने ११,६९१.३० चा आकडा गाठला.  

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात निराशेचे वातावरण होते. शनिवारी आठवड्याच्या अखेरीस बाजार थोढासा वधारला होता. परंतु, रविवारी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. त्यात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज सर्वच संस्थांच्या एक्झिट पोलमधून देण्यात आला. त्याचा अपेक्षेप्रमाणे सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.