पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना इफेक्ट : २००८ नंतर शेअर बाजारात सर्वांत मोठी घसरण

शेअर बाजारात पडझड

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणूला 'जागतिक साथ' घोषित केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारामध्ये वादळ उठले. भारतीय शेअर बाजारात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सेन्सेक्स २९२९ अंकांनी कोसळून ३२,७७८.१४ वर बंद झाला. मागील ५२ आठवड्यातील सर्वांत नीचांक आहे. तर निफ्टी पण ८२५ अंकाच्या मोठ्या नुकसानीबरोबर ९,६३३.१० स्तरावर बंद झाला. 

तत्पूर्वी, कोरोना व्हायरसबाधितांची संख्या जगभरात वाढत असताना त्याचा गंभीर परिणाम आता आर्थिक आघाडीवरही दिसू लागला आहे. जगातील सर्वच महत्त्वाच्या शेअर बाजारांच्या निर्देशांकात पडझड झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात गुरुवारी सकाळी मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १८०० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीमध्येही ५०० अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 

कोरोनाबाधितांची नावे उघड केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार

निफ्टीमध्ये ५०० अंकांची घसरण झाल्यामुळे तो निर्देशांक १०००० च्याही खाली गेला. २६ मार्च २०१८ नंतर पहिल्यांदाच निफ्टी इतक्या खालच्या पातळीवर गेला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्सही बाजार सुरू होताच १८०० अंकांनी कोसळला. सेन्सेक्स ३३९५७ पर्यंत खाली आला.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांमध्येही घसरण झाल्याचे गुरुवारी सकाळी दिसले. रुपया गेल्या १७ महिन्यातील निचांकी पातळीवर जाऊन पोहोचल्याचे दिसले. रुपयाच्या घसरणीनंतर एका डॉलरसाठी ७४.२५ रुपये मोजावे लागणार आहेत. 

कोरोनाची जागतिक साथ, WHO ची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी युरोपमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीवर तूर्त बंदी घातली आहे. कोरोना व्हायरसला अटकाव घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर जगातील महत्त्वाच्या सर्वच शेअर बाजारांमध्ये गुरुवारी सकाळी पडझड झाल्याचे पाहायला मिळाले.