पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेन्सेक्समध्ये ६०० अंकांनी घसरण, शेअर बाजारावर चिंतेचे ढग

मुंबई शेअर बाजार

सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्समध्ये मंगळवारी ६२२ अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तर निफ्टीही १०८५०च्या पातळीवर जाऊन पोहोचला. बँकिंग, वाहन उद्योग, धातू आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील शेअर्सच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. 

'तुरुंगात गेलेल्यांनी शरद पवारांनी काय केलं हे सांगू नये'

हिरो मोटो कॉर्पच्या शेअरमध्ये ४.४ टक्के, ऍक्सिस बँकेच्या शेअरमध्ये ३.७५ टक्के तर आयसीआयसीआय, एसबीआय, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, टाटा स्टील, मारुती, एचडीएफसी आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअरमध्ये २ ते ३ टक्क्यांनी घट झाली. त्याचवेळी वेदांता, गेल, टायटन, एशियन पेंट्स आणि येस बँक या कंपन्यांच्या शेअरमध्ये काहीशी वधारणा झाल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले.

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता आणि या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि चीनमध्ये होणारी पुढच्या टप्प्यातील व्यापार चर्चा याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. 

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि...

दरम्यान, सौदी अरेबियामध्ये तेलाच्या विहिरींवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर कच्च्या तेलाच्या भावात एकदम १४ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्यामध्ये मंगळवारी किंचितशी घट झाल्याचे बघायला मिळाले आहे.