मुंबई शेअर बाजारात आठवड्यात सुरुवातीलाच पुन्हा पडझड पाहायला मिळाली. सोमवारी दुपारपर्यंत निर्देशांकात २३४२ अंकाची मोठी घसरण झाली. शेअर बाजार सुरु होताच झालेली घसरण दुपारपर्यंत कायम होती. दुपारी निर्देशांकात २३४२ अंकाची घसरण होऊन सेन्सेक्स ३५, २३४ वर आला. निफ्टीही घसरून तो १०, ४०० वर आला.
मुंबई शेअर बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात पडझड झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारीदेखील शेअर मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स १४०० अंकानी आपटला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्यही घसरले तर कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत.
कच्च्या तेलाचे दर ३० टक्क्यांने कोसळले, १९९१ नंतरची सर्वात मोठी घसरण
कोरोना व्हायरसमुळे जगभरात आर्थिक मंदीचे ढग दाटत आहे. उद्योगधंदे आणि वाहतुकीवर मर्यादा असल्यानं याचा मोठा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. मुडीजच्या अहवालानुसार पहिल्या सहा महिन्यांत कोरोनामुळे जगभरातल्या आर्थिक व्यवाहारांवर परिणाम होतील असं भाकीत वर्तवलं आहेय
Sensex at 35,640.62; down by 1936.00 points. pic.twitter.com/NCSCsda8n4
— ANI (@ANI) March 9, 2020
एकीकडे कोरोनाच्या समस्येचा विळखा अर्थव्यवस्थेला बसला आहे तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यातील तेलयुद्धामुळे शेअर बाजाराचं चित्र पालटलेलं पाहायला मिळत आहे. या दोन्ही देशांमधील तेलयुद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमीतीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. या दोन समस्या तसेच गेल्या आठवड्यात येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांमुळे या आठवड्यात बाजार सुरु होताच गुंतवणुकदारांची निराशा झालेली पाहायला मिळाली.
Coronavirus Updates : देशात ४१ जणांना लागण, केरळमध्ये नवे रुग्ण