पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस उद्यापासून धावणार; जाणून घ्या तिकीटाचे दर

तेजस एक्स्प्रेस

देशातील दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस रविवार म्हणजे १९ जानेवारी २०२० पासून धावणार आहे. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणारी ही रेल्वे रविवारी प्रवाशांसाठी खुली होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शुक्रवारी ही रेल्वे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना केली. ही रेल्वे आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. तर गुरुवारी तेजस एक्स्प्रेस धावणार नाही. दरम्यान, आयआरसीटीसीने या आधी लखनऊ ते दिल्ली दरम्यान देशातील पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस सुरु केली आहे. 

जावेद अख्तर- शबाना आझमीच्या गाडीला मुंबई- एक्स्प्रेसवेवर अपघात

अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसने प्रवास करायचा असेल तर आयआरसीटीसी वेबसाइट आणि त्यांचे ऑनलाइन भागीदार पेटीएम, फोनपे, मेक माय ट्रिप, गूगल, आबीबो, रेल यात्री इत्यादी अॅपच्या माध्यमातून तिकिट आरक्षित करता येतील. रेल्वे काउंटरद्वारे या रेल्वेचे तिकिट बुकिंग केले जाणार नाही. तर तेजस एक्स्प्रेसमध्ये १८ परदेशी पर्यटकांसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. 

'...तर राहुल गांधींना सर्वात आधी अंदमानच्या तुरुंगात पाठवावे लागेल'

तेजस एक्स्प्रेस पूर्णत: वातानूकुलित आहे. ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह क्लासचे दोन डबे लावण्यात आले असून त्यात ५६-५६ सीट आहेत. या व्यतिरिक्त या रेल्वेला चेयर कारचे ८ डबे लावण्यात आले आहेत. यामध्ये ७८-७८ सीट आहेत. तेजस एक्स्प्रेसमधून ७३८ प्रवासी एका वेळी प्रवास करु शकणार आहेत. या रेल्वेमध्ये एसी चेअरकारसाठी १ हजार ६५९ तिकीट आहे. तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी २ हजार ५४७ ऐवढे तिकीट आहे. 

'विद्यापीठे ही फक्त वीटा-मातीपासून तयार झालेली नाहीत'

तेजस एक्स्प्रेस अहमदाबादवरुन सकाळी ६.४० वाजता सुटणार आहे तर दुपारी १.१० वाजता ती मुंबईत दाखल होणार आहे. तर नांदेड, वडोदरा, भरुच, सूरत, वापी आणि बोरीवली स्थानकावर ही रेल्वे थांबणा आहे. तर मुंबईवरुन ही रेल्वे दुपारी ३.४० वाजता सुटणार आहे तर अहमदाबाद येथे रात्री ९.५५ वाजता दाखल होणार आहे. 

'इतिहासावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या विषयांवर चर्चा करा'