पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टेट बँकेकडून नव्या पद्धतीने गृहकर्ज, १ जुलैपासून ग्राहकांपुढे दोन पर्याय

स्टेट बँक ऑफ इंडिया

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने नव्या पद्धतीने गृहकर्ज देण्याची तयारी केली आहे. रेपो दरावर आधारित व्याजदर हे या गृहकर्जाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असणार आहे. येत्या १ जुलैपासून बँकेकडून या पद्धतीने कर्ज दिले जाणार आहे. अर्थात या पद्धतीच्या कर्जासाठी काही विशिष्ट नियम व अटींची पूर्तता ग्राहकांना करावी लागणार आहे. नव्या पद्धतीने देण्यात येणाऱ्या या कर्जामध्ये ग्राहकांना व्याजदरात सवलत मिळणार आहे. 

टिकटॉक व्हिडिओ करण्यासाठी तो चक्क चोरटा झाला!

वर्षाला किमान सहा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांनाच या पद्धतीच्या गृहकर्जासाठी अर्ज करता येईल. त्याचबरोबर कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी ३५ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये, याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बँकेकडून घेत असलेले गृहकर्ज घराच्या एकूण किमतीच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर ग्राहकांना कर्जावर ०.२० टक्के अधिक व्याज द्यावे लागेल. 

रेपो दरावर आधारित व्याजदराची आकारणी करण्याचा स्टेट बँकेचा हा देशातील पहिलाच प्रयत्न आहे. आतापर्यंत बँकांकडून देण्यात येणारे गृहकर्ज एमसीएलआर पद्धतीने दिले जात होते. २०१६ पासून बँकांकडून याच पद्धतीने गृहकर्ज दिले जाते. 

गिरीश महाजनांना फोडाफोडीचे अतिरिक्त खाते द्याः धनंजय मुंडे

स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक पी के गुप्ता म्हणाले, रेपो रेटला जोडलेल्या योजनेसोबतच ग्राहकांकडे एमसीएलआर पद्धतीने गृहकर्ज घेण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. ग्राहका या दोन्ही पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडू शकतात. जर रेपो रेटवर आधारित योजना निवडल्यास रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात होणाऱ्या बदलांच थेट परिणाम ग्राहकांच्या गृहकर्जाच्या व्याजदरांवर होणार आहे.