पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SBI अलर्टः लवकरच बंद होतील 'या' ग्राहकांचे ATM debit कार्ड

एसबीआय

जर तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) खाते आहे आणि बँकेच्या एटीएम-डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्ही सतर्क होणे गरजेचे आहे. एसबीआयने टि्वट करत ग्राहकांनी आपले जुने मॅग्नेटिक एटीएम-डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांना हे काम ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत करायचे आहे. कारण नवीन वर्षापासून आपले जुने एटीएम-डेबिट कार्डमधून पैसे काढता येणार नाही.

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांची व्यथा

ज्या ग्राहकांकडे जुने मॅग्नेटिक कार्ड आहे, त्यांनी ते त्वरीत बदलावे लागेल, असे एसबीआयने टि्वट करुन सांगितले आहे. या कार्डऐवजी ग्राहकांना ईव्हीएम चिप असलेले डेबिट कार्ड घ्यावे लागेल. याची अंतिम तारीख ही ३१ डिसेंबर २०१९ आहे.

एसबीआय बँक एटीएम-डेबिट कार्डवर कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी आणि आधीपेक्षा सुरक्षित बनवण्यासाठी नवे ईएमव्ही चिप कार्ड जारी करत आहे. हे नवे चिप असलेले एटीएम-डेबिट कार्ड कोणत्याही शूल्काविना दिले जात आहेत.

'नौदलाकडे २०२२ पर्यंत भारतीय बनावटीची विमानवाहू नौका असेल'

ग्राहकांना हे कार्ड घेण्यासाठी आपल्या गृह शाखेत जाऊन अर्ज दाखल करावा लागेल. जर तुम्ही नेट बँकिंगचा वापर करत असाल तर एटीएम-डेबिट कार्डसाठी ऑनलाइन अर्जही दाखल करु शकता.

यामुळे कॅगने केले केजरीवाल सरकारचे कौतुक