पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SBIचा अहवाल, यावर्षी १६ लाख नोकऱ्या घटणार

एसबीआय

देशाच्या अर्थव्यवस्थेत मरगळ आल्याने रोजगारावर याचा मोठा परिणाम झाला आहे. चालू आर्थिक वर्षांत नवीन नोकरीच्या संधी मागील वर्षापूर्वीच्या तुलनेत १६ लाखांनी कमी होणार असल्याचा अंदाज आहे. एसबीआयच्या संशोधन अहवालातून ही बाब समोर आली आहे. 

अहवालात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये मागील आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या तुलनेत १६ लाख नोकऱ्या कमी निर्माण होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी एकूण ८९.७ लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होता. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) आकडेवारीनुसार २०१९-१९ मध्ये ८९.७ लाख रोजगाराची निर्माण झाले होते. चालू आर्थिक वर्षांत यामध्ये १५.८ लाख घट होण्याचा अंदाज आहे. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार मुख्य स्वरुपात कमी वेतन म्हणजे महिना १५००० रुपये वेतन असलेल्या नोकऱ्यांचा समावेश आहे. एप्रिल-ऑक्टोबरदरम्यान ईपीएफओबरोबर ४३.१ लाख नवे अंशधारक जोडले गेले. 

मोदी सरकारपुढे आता महागाईचे संकट, काँग्रेसची जोरदार टीका

सरकारी नोकऱ्या घटल्याः ईपीएफओमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या नोकरी आणि खासगी काम/व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आकडेवारीचा समावेश नाही. २००४ पासून हे आकडे राष्ट्रीय पेन्शन योजने (एनपीएस) अंतर्गत स्थानांतरित करण्यात आले आहे. अहवालानुसार, रोजगाराच्या एनपीएस श्रेणीच्या आकडेवारीतही राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सध्याच्या ट्रेंडनुसार चालू आर्थिक वर्षांत ३९००० कमी संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे.

कर्जासाठी आवश्यक आर्थिक पुरावे लवकरच एका क्लिकवर सादर करता येणार

मे २०१९ मध्ये केंद्र सरकारने बेरोजगारी स्तर मागील ४५ वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचल्याचे म्हटले होते. जुलै २०१७ ते जून २०१८ दरम्यान बेरोजगारी दर ६.१ टक्के होता. तर त्याचवेळी ७.८ टक्के शहरी युवकांकडे नोकरी नव्हती. 

उद्योग जगतातील मरगळीमुळे श्रमिकांची मागणी घटली आहे. अनेक कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या क्षेत्रात बेरोजगारी वाढली आहे. 

वॉलमार्ट इंडिया १०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार

या अहवालानुसार, आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशासारख्या राज्यांतील मजूर नोकरीसाठी बाहेरच्या राज्यात गेले आहेत. त्यांच्याकडून घरी पैसे पाठवण्यातही घट झाली आहे. याचाच अर्थ श्रमिकांची संख्या घटली आहे.