पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एसबीआयचा झटका; बचत खाते, एफडीचे व्याजदर घटवले

एसबीआय एटीएम

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने बुधवारी बचत खात्याबरोबरच मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात कपात केली आहे. बँकेने एक लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉजिट असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदर ३.५ टक्क्यांवरुन कमी करुन ३.२५ टक्के केले आहे. नवीन दर एक नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. त्याचबरोबर एक वर्ष ते दोन वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात १० आधार अंकांची (०.१० टक्के) कपात केली आहे. ही कपात १० ऑक्टोबरपासूनच लागू होणार आहे.

जिओच्या प्लॅनमध्ये मोठा बदल, यापुढे फोन लावला तरी पैसे द्यावे लागणार

यापूर्वी, एसबीआयने एक लाख रुपयांपेक्षा जास्त ठेव असलेल्या खात्यांचे व्याजदर रेपो रेटशी जोडण्याची घोषणा केली होती. सध्या तो ३ टक्के आहे. एसबीआयने बचत खाते तसेच एफडीवरील व्याजदरात कपातीमागे गेल्या वर्षी पर्याप्त तरलतेचा हवाला दिला आहे. बँकेने एक लाख रुपयांहून अधिक रक्कम असलेल्या बचत खात्यावरील व्याजदर कायम ठेवले आहेत.

एसबीआयकडून ग्राहकांना दिवाळी भेट; सहाव्यांदा व्याज दरात कपात

एसबीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंत्रणेतील पुरेशा तरलतेला पाहत बचत खात्यांवरील व्याज दर ३.५० टक्क्यांवरुन ३.२५ टक्के आणला आहे. येत्या एक नोव्हेंबरपासून हे लागू होईल.

जागतिक आर्थिक मंदीचा भारतावरही परिणामः आयएमएफ प्रमुख