देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सेवा शुल्कात आणि त्याच्या नियमात बदल केले आहेत. स्टेट बँकेकडून करण्यात आलेले हे बदल आजपासून, मंगळवार १ ऑक्टोबर लागू होणार आहेत. स्टेट बँकेत खाते असलेल्या प्रत्येकाने हे बदल समजून घेतले पाहिजेत. नाहीतर त्यांच्या खिशालाच त्याचा फटक बसणार आहे.
प्लास्टिकच्या पिशवीतून पैसे आणल्याने उमेदवाराला ५ हजारांचा दंड
स्टेट बँकेच्या खातेदारांना आता बँकेमध्ये किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. बॅंकेने आपल्या शाखांची तीन गटांत विभागणी केली आहे. यामध्ये मेट्रो-शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भाग यांचा समावेश आहे. शहरी भागातील लोकांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या बचत खात्यात किमान ३००० रुपये ठेवणे आवश्यक आहे. तर निमशहरी शाखेतील खातेदारांसाठी हीच रक्कम २००० रुपये आहे आणि ग्रामीण भागातील खातेदारांसाठी हीच रक्कम १००० रुपये आहे. जर एवढी रक्कम खात्यात नसेल, तर सरासरी किती शिल्लक आहे. यानुसार खातेदारांना दंडही भरावा लागेल. ही रक्कम खात्यात किती पैसे शिल्लक आहेत, यावर अवलंबून असेल.
बँकेच्या शाखेतून जास्तवेळा पैसे काढल्यासही यापुढे दंड भरावा लागणार आहे. ज्यामध्ये तुमच्या खात्यात सरासरी २५ हजार रुपये शिल्लक असतील तर महिन्याला दोन वेळा तुम्हाला खात्यातून मोफत पैसे काढता येतील. त्यानंतर पैसे काढल्यास दंड भरावा लागेल. २५००१ ते ५०००० सरासरी शिल्लक तुमच्या खात्यात असेल तर १० वेळा बँकेच्या शाखेतून मोफत पैसे काढता येतील. ५०००१ ते १ लाखापर्यंतच्या रकमेसाठी १५ वेळा बँकेच्या शाखेतून मोफतपणे पैसे काढता येतील. जर खात्यावरील सरासरी शिल्लक एक लाखांपेक्षा जास्त असेल तर खातेदार कितीहीवेळा बँक शाखेतून पैसे काढू शकतात. त्यांना कोणताही दंड भरावा लागणार नाही.
दोन कॉन्ट्रॅक्ट किलरना अटक, मुंबईतील व्यावसायिकाने दिली होती सुपारी
बँकेच्या शाखेत पैसे भरण्यासाठीही नवे नियम लागू झाले आहेत. यापुढे खातेदार महिन्यातून तीन वेळा खात्यात मोफत पैसे भरू शकतात. पण त्यापेक्षा जास्तवेळा पैसे भरल्यास प्रत्येक व्यवहारावर ५० रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल.
जर ग्राहकांनी इंटरनेटच्या माध्यमातून एनईएफटी आणि आरटीजीएस केले तर ते विनाशुल्क असेल. पण बँकेत जाऊन एनईएफटी किंवा आरटीजीएस केले तर त्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे.